श्रीगोंद्याचे
ग्रामदैवत शेख महंमद
महाराज (शके 1549 ते 1618) -
मुलानी घराण्यात,
आष्टी तालुक्याजवळ पुंडीवाहीरे
गावात शेख महंमद बाबा
यांचा जन्म झाला. वडिलांच्या
सांगण्यावरून बक-याला
कापायला सुरा घेवून महंमद
बाबा गेले असता, बकरू मोठ्याने
ओरङू लागले, ते पाहून स्वतःच्या
करंगळीवरून सुरा फीरवून
पाहीला, स्वतःच्या करंगळीतून
रक्त पाहून व स्वतःस होणा-या
वेदनावरून त्यांना बक-याला
होणा-या वेदनाचा विचार
केला व देवाचे नाव घेत
घरदार सोडले.
अशीच
भटकंती करत असतांना राजाच्या
सेवकांनी त्यांच्या डोक्यावर
ओझे दिले. पुढे गेल्यावर
एका डोगरावर त्यांनी
ते ओझे टाकले असता सर्व
ओझे जळून खाक झाले म्हणुन
त्या डोगराला आजही खाकीबाबाचा
डोंगर असे म्हणतात.
पुढे शेख महंमद महाराज
श्रीगोंदा
शहरात वास्तव्यास आले.
धर्माने मुसलमान असुनहि
हिदू धर्मानुसार भजन,
कीर्तनाव्दारे समाजास
मार्गदर्शन करण्याचे
काम केले.